आज १ मे. महाराष्ट्र दिन.. अतिशय उत्तम मुहूर्त आहे माझ्या मनातील इच्छा पूर्ण करण्याकडे एक पाऊल टाकण्यासाठी.
गेली कित्येक दिवस मनात एक विचार घोळत होता. महाराष्ट्रातील मंदिरांवर प्रकाश टाकण्याचा. मराठी भाषेतून. मराठीत लिखाण हे माझ्यासाठी नविन नाही आहे. महाविद्यालयिन जिवनात मी मराठी भाषेत ब्लॉग लिहायचो. नंतर व्यवसायिक आणि वैयक्तिक व्यस्ततेमुळे लिखाण मागे पडत गेले. मध्यांतरी लॉकडाऊनच्य़ा वेळी पुन्हा एकदा लिखाणासाठी आणि मंदिरांमध्ये असणा~या आवडीसाठी वेळ देण्यास सुरूवात केली.
महाराष्ट्र हा जसा गडकिल्यांचा देश आहे, तसाच तो मंदिरांचा देखिल देश आहे. इस पूर्व ३०० पासून अगदी १८१८ पर्यंत सर्वच साम्राज्यांनी महाराष्ट्रात अतिशय सुंदर मंदिरे बांधलेली आहेत. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी मंदिर, वणीचे सप्तश्रुंगी मंदिर, रामटेकचे राम मंदिर अशी अनेक धार्मिक केंद्रे महाराष्ट्रात आहेत. त्यासोबतच खिद्रापूर, अंबरनाथ, बीड, धर्मापुरी, लासूर, सिन्नर, लोणार, चामरोशी अश्या शहरांमध्ये शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली सुंदर मंदिरे आहेत. येत्या काळात आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रेमाच्या साथीन मी आपणास या सर्व मंदिरांच्या भेटीसाठी घेऊन जाणार आहे. देणार ना माझी साथ ?